हृदयी सदा नाम जपे रा
765.
हृदयी सदा नाम जपे राम । तया बाधी ना क्रोध काम ॥१॥
हे तो आले अनुभवां । जीवां सर्वा कलियुगीं ॥२॥
अजामेळादि पापराशि । नामे नेले वैकुंठासी ॥३॥
गणिका तारिलीसे देखा । म्हणे जनार्दनी एका ॥४॥