(श्री ज्ञानेश्वर महा
3387.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश. )
काय ज्ञानेश्वरी उणे । तिही पाठविले धरणे ॥१॥
ऐकोनिया लिखित । ह्मुण जाणवली हे मात ॥धृपद॥
तरी जाणे धणी । वदे सेवकाची वाणी ॥२॥
तुका म्हणे ठेवा । होता सांभाळावे देवा ॥३॥
अर्थ :
ज्ञानियांचे देखील जे राजे आहेत असे ज्ञानेश्वर महाराज यांना उपदेश करण्यासाठी काय उणे होते की त्यांनी माझ्याकडे धरणेकऱ्याला पाठविले ? ‘माझ्या दारामध्ये हा ब्राम्हण कृपा होण्यासाठी धरणे धरुन बसला होता’ हे वाक्य श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पत्रामध्ये लिहिले होते व तोच मजकूर मला धरणे धरणाऱ्या ब्राम्हणाच्या तोंडून ऐकण्यास मिळाला त्यावेळी मला ही गोष्ट समजली. माझे स्वामी सर्व जाणतात तरी देखील सेवकाच्याच वाणीतून ते वदवून घेत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा परमार्थाचा जो ठेवा आहे तो तुम्हीच सांभाळावा कारण त्याचे खरे अधिकारी तर तुम्हीच आहात.
