कधी भेटेल रघुपती । म
923.
कधी भेटेल रघुपती । मजला सांगा मारुती ॥धृ.॥
मी अपराधी शब्द शरानें । दुःखित उर्मीलापती । की मजला सांगा बा० ॥१॥
साधु छळले माझे मज कळलें । वनी राक्षस संगती । की मजला० ॥२॥
एका जनार्दनी आश्रय तुझा । सज्जन जन जाणती । की मजला० ॥३॥
