प्रपंचाची वस्ति व्यर
221.
प्रपंचाची वस्ति व्यर्थ काह्या काज । आम्हा बोलता लाज येतसये ॥१॥
काय करू हरि कैसा हा गवसे । चंद्र सूर्य अवसे एकसूत्र ॥२॥
तैसे करू मन निरंतर ध्यान । उन्मनि साधन आम्हा पुरे ॥३॥
निवृत्ति परिपाठ हरिनाम हेचि वाट । प्रपंच फुकट दिसे आम्हा ॥४॥
अर्थ:
मायेच्या पटला मुळे भासमान होणारा अज्ञानी प्रपंचात काय म्हणुन राहयचे हे बुध्दीरुप सखी त्या विषयी बोलताना ही लाज वाटते. जसे चंद्र सुर्य आवसेला एकसुत्र होतात तसे त्या ब्रह्मरुपाला मिळवण्यासाठी जीव ला त्याच्याशी एकरुप व्हावे लागेल. त्यासाठी उन्मनी अवस्थेत त्याचे चिंतन मनन करणे हेच साधन आहे निवृत्तीनाथ म्हणतात माझा हरिनामाचा परिपाठ असल्यामुळे तो प्रपंच फुकाचा वाटतो.
