नाही जनी विजनी विज्ञ
220.
नाही जनी विजनी विज्ञानी । निर्गुण काहाणी आम्हा घरी ॥१॥
सुलभ हरि दुर्लभ हरि । नांदे माजघरी आमचीये ॥२॥
आनंदे सोहळा उन्मनीचि कळा । नामचि जिव्हाळा जिव्हे सदा ॥३॥
निवृत्ति देवी धरिली निर्गुणी । शांति हे संपूर्णी हरीप्रेमे ॥४॥
अर्थ:
ज्या गोष्टी जनामध्ये वनामध्ये व प्रपंचाच्या ज्ञानात नाहीत त्या निर्गुण कहाण्या आमच्या घरात आहेत. जरी तो परमात्मा सुलभ मानला किंवा दुर्लभ मानला कसाही मानला तरी तो आम्हा सोबत आमच्या घरी आहे. आमच्या जिव्हेला त्याच्या नामाचा छंद लागल्या मुळे आम्ही सतत आनंदी व उन्मनी अवस्थेत सुख भोगत आहोत. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या निर्गुण हरिला प्रेमाने आम्ही हृदयात धरल्यामुळे आम्हाला सतत शांती प्राप्त होते.
