पदोपदी पाया पडणे । क
3368.
पदोपदी पाया पडणे । करुणा जाण भाकावी ॥१॥
ये गा ये गा विसांवया । करुणा दयासागरा ॥धृपद॥
जोडोनिया करकमळ । नेत्री जळ भरोनि ॥२॥
तुका उभे दान पात्र । पुरवी आर्त विठोबा ॥३॥
अर्थ :
पदोपदी देवाच्या पाया पडावे आणि त्याला करुणा भाकावी. आणि म्हणावे हे माझी विश्रांतीस्थान असलेल्या करुणेच्या दयेच्या सागरा तू ये, तू ये. आपले कमलासारखे कर जोडून डोळयामध्ये प्रेमाश्रूरुपी जळ भरुन विनंती देवाला करावी. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा विठोबा मला तुझ्या दानास पात्र कर मी तुझ्यापुढे माझे दोन्ही हात जोडून उभा आहे आणि माझी आर्त इच्छा पूर्ण कर.
