बरवा झाला वेवसाय । प
4016.
बरवा झाला वेवसाय । पावलो चिंतिला चि ठाव । दृढ पायी राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥
बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचे जालिया दर्शन । जन्ममरण नाही आता ॥धृपद॥
बरवे जाले आलो या ठाया । होते संचित ठायींच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥२॥
जोडिले हे न सरे धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूर्ती मधुसूदन । सम चरण देखियेला ॥३॥
जुनाट जुगादिचे नाणे । बहुता काळाचे ठेवणे । लोपले होते पारिखेपणे । ठावचळणे चुकविला ॥४॥
आता या जीवाचियासाठी । न सुटे पडलिया मिठी । तुका म्हणे सिणलो जगजेठी । न लवी दिठी दुर्याची ॥५॥
अर्थ :
देवा तुमच्या पावलाचे चिंतन करून माझा भक्तिभाव तुमच्या पायाच्या ठिकाणी एकनिष्ठ झाला हा माझा परमार्थिक व्यवसाय अतिशय चांगला झाला आहे. तुमच्या पायाच्या ठिकाणी माझा भक्तिभाव दृढ राहिला आणि माझ्या जीवाला विश्रांती प्राप्त झाली सर्व शकुन फलद्रूप झाले असून सर्व शीण नाहीसा झाला आहे. देवा तुमचे मला दर्शन झाले त्यामुळे आता मला जन्म-मरणाच नाही राहिले बरे झाले मी या ठिकाणी आलो माझे पूर्व संचित चांगले होते त्यामुळे मी येथे येऊ शकलो. माझा देहभाव बदलला माझ्या शरीरावर परब्रह्माची सावली पडली मी ब्रम्ह रूपच झालो हे अविनाश, आनंदधन मला लाभले आहे ते केव्हाही संपणार नाही. असा तो अमूर्ति निराकार परमात्मा मी त्याचे दोन्ही समचरण मूर्तिमंत आकार रूप झालेले प्रत्यक्ष डोळ्याने देखीयले आहे. असे हे धन अतिशय पुराणिक असून खूप दिवसापासून येथे ठेवले आहे. परंतु हे नाणे परीक्षका वाचून गुप्त होते या नाण्याचे ठिकाण कोणालाही लवकर सापडले न
