सर्वांठायी देव एकचि
624.
सर्वांठायी देव एकचि अनेक ।
विस्तारले नाना सुंदर कौतुक ।
सर्व क्षेत्रे तीर्थे अंती गतिदायक ।
भिन बघता पिंडी ब्रह्मांडी एक ॥१॥
जयदेव जयदेव जय चित्सुखधामा ।
जय आत्मारामा ।
आरती वोवाळिते निजहित विश्रामा॥धृ॥
हरिहर ब्रह्मादिक चिन्मात्रे तूचि ।
आगमानिगमा सीमा नकळे गणनेची ।
पूर्वापूर्व आत्माराम मूळरूप तू हेच ।
तुजविण बघता दुसरे अन्यहि नाहीच ॥२॥
तारक नाम तुझे ब्रह्म हे गाजे ।
अर्धचंद्र उदयो होऊनि विराजे ।
तेणे आत्मज्योती विश्व हे साजे ।
तो तू गुरू भवहारक वंदित बहिणी गर्जे ॥३॥
