वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

अंजनाचे अंजन सदोदीत

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075095 · अभंग क्र. ३७५

375.
अंजनाचे अंजन सदोदीत पाहिले ।
पाहाणे होउनि ठेले सर्वा ठायी ॥१॥
आता बोलाबोली नको बा आणिक ।
बिंदु ती निःशंक ब्रह्म रया ॥२॥
अनुहात उन्मनी म्हणोनी व्यर्थ काय ।
मुखी धरी सोय ब्रह्मरंध्री ॥३॥
ज्ञानदेव म्हणे न बोले आणिक ।
डोळियांची बोल पाहतांची ॥४॥

अर्थ :
दिव्यदृष्टी ज्याने प्राप्त होते असे जे ज्ञानांजन म्हणजे ज्ञानाचे ज्ञान असे जे ब्रह्म पाहिले. व त्याचे रुप मी बनलो. त्याच्याविषयी शब्दाच्या वाटाघाटी करण्याची गरज नाही. ब्रह्मरंध्राचे ठिकाणी दिसणारा जो बिंदु हेच त्याचे रुप आहे. अनुहत उन्मनी अशा योगाभ्यासातील शब्दांचा नुसता उच्चार करुन काय उपयोग. त्या ऐवजी योगाभ्यास करून ब्रह्मरंधातील बिंदु पाहाण्याचा प्रयत्न कर. योगी पुरुषाची परीक्षा त्याच्या डोळ्यांतील तेजावरून आम्हाला करता येते. यापेक्षा अधिक काय सांगावे? असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग