वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

अकार उकार मकार ओंकार

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075091 · अभंग क्र. ३७६

376.
अकार उकार मकार ओंकार ।
प्रणव हा साकार सुरेख रे ॥१॥
मसुरामात्र सार योगी ध्याती देही ।
निरंजन पाही मग तेंची ॥२॥
ज्ञानदेव म्हणे देह झाले देव ।
प्रणवची शिव अनुभवे ॥३॥

अर्थ :
अकार, उकार, मकार व अर्धमात्रा मिळून प्रणवरूप ओंकार, साकार व सुंदर बनला आहे. याच ओंकाराचा आकार मसुराच्या डाळी एवढा मानून आपल्या देहातच योगी लोक परब्रह्म रूपाचे ध्यान करतात. हा ओंकारच ब्रह्म आहे. त्या ओंकाराच्या अनुभवाने देह, देव व ओंकार हे तिन्ही ब्रह्मरूप आहेत असे माझ्या अनुभवाला आले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग