वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 207. गोंधळ

प्रथम अवतारी आई थोर

🙏 4. संत नामदेव · ABH-081946 · अभंग क्र. २११२

2112.
प्रथम अवतारी आई थोर ख्याती केली वो |ब्रह्मयाच्या कैवारा आपण मत्स्यरूप जाली वो |धुंडाळिळा सागर आई शंखासुरा मिठी घाली वो |प्आणिले चारो वेद ब्रह्मपुरो त्वा स्थापिली वो ॥१॥
ऐसी बहु लोका माझारी आई खेळतसे 'गोंधळी वो |भूलोका माझारी अंबा नाचतसे वो |संव्हारी दैत्य अंबा करी गदारोळी वो ॥२॥
कूर्म 'वेष धरूनी धरणी पाठीवरी धरली वो |महेंद्र मंथत मेळी अंबा वेगीसी पावली वो |समुद्रमंथन करिता आई बरवा गोंधळ घाली वो |नारायण वबिदववरूप देवा जे त्वांच दिधले वो ॥३॥
|वराहरूप धरूनी आई थोर पवाडा केला' वो |पृथ्वीच्या कवारा घालिसी गोंधळ दाढा वो |वधिला हिरिण्याक्ष त्याचा केला त्वा रगडा वो |खेचर चि देवता धरणी धरीयली दाढा वो ॥४॥
त्रिकाळ रूप धरूनी स्तंभ फोडनि निघाली वो |सिहनादे गर्जता हांक त्रिभुवनी गाजली वो |वधिला हिरण्यकशयप अंतरमाळा गळा घाली वो |प्रल्हादाकारणे केसी गोंधळी नाचली वो ॥५॥
इंद्राच्या कैवारा आई साने रूप धरिले वो |बळिच्या द्वारा जाऊन भूमिदात मागितले वो |त्रिलोक मोजता बळीस पाताळी घातले वो |मागुता येईल म्हणवुनी त्याचे द्वार त्वा रक्षिले वो ॥६॥
जमदग्नि रेणुके कुशी धरियिला अवतार वो |हाती परशु घेऊनी केला दैत्यांचा संहार वो |एकविस वेळ मेदिनी नि:क्षत्रिय करूनी फेडिला भूमिभार वो |वधिला सहस्त्रार्जुन कामधेनुच्या कैवारा वो॥७॥
पितृवचना कारणे आई वनवासासी गेली वो |अठरापद्मे वानर भेळवुनि गोंधळ घाली वो |वघिला दशशिर लका शरणागत दिधली वो |कौसल्या माऊली देवा बंदी सोडी केली वो ॥८॥
वसुदेवकुळटिळके तरी तू कंसासुरे मारिते वो |'कुळांतकुळतारिके तरि तू कोरव संहारिते वो |पांडव प्रतिपाळके भक्‍तजनासि तारके वो |तुझा गोंधळ गाता अंबे कोण वणू शके वो ॥९॥
'विधीमागे सांडुन असुरे देवा गांजियळे वो |त्याचिया केवारा आई त्वा सोम्यरूप धरिले वो |बौद्ध रूप धरुनि भक्‍तालागी मोहिले वो |कौसल्या देवता जे त्या रुपे त्वा दिधळे वो ॥१०॥
कलियुगाच्या अंती थोर होईल अन्नाने वो |एकी ठायी होऊन खातील चारी वर्ण वो |तेव्हा पृथ्वी-भारे तुजला येईल शरण वो |तेव्हा तू पावसी कलंकी अवतार धरूनी वो ॥११॥
पुंडलिकाकारणे पंढरपुरी केला वास वो |तुझा गोंधळ गाता थोर जिवा उल्हास वो |तू माये माऊळी तुझा भज बहु विश्‍वास वो |विनवी विष्णुदास नामा तुझ्या दासाचा मी दास वो ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग