वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

निरालंब बीज प्रगटे स

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090008 · अभंग क्र. १००

100.
निरालंब बीज प्रगटे सहज । तो गौळियांचे काज करी कृष्ण ॥१॥
हरि हा सावळा वेधिलिया बाळा । माजि त्या गोपाळा गायी चारी ॥२॥
वंदिती सुरगण ब्रह्मादिक चरण । तो यशोदेसि स्तन मागे हरि ॥३॥
निवृत्तिचे ध्यान मनाचे उन्मन । योगिया जीवन हरि माझा ॥४॥

अर्थ:
जो परमात्मा कोणावर अवलंबुन नाही तो विश्वाचे बीज होऊन प्रगटला आहे. तरी ही तो गौळ्यांची कामे करत असतो. ज्याच्या रुपावर गवळणी लुब्ध झाल्या त्या कृष्णरुपात तो गायी चारतो.ज्याच्या चरणसेवेसाठी सुरगण व योगी तिष्टत असतात तो कृष्ण यशोदेकडे स्तनपानाचा हट्ट करतो. निवृती नाथ म्हणतात ज्या श्रीकृष्ण नामाचे ध्यानी ध्यान करतात तोच त्या योगीजनांचा प्राण आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग