संत महावैद्य भवरोग फ
295.
संत महावैद्य भवरोग फेडिती ।
सांगे ते गति ऐक त्यांची ॥१॥
अर्धमात्रा रस देउनिया जीव ।
रोग दूरी सर्व करिताती ॥२॥
विषयाचा त्याग सांगोनिया पथ्य ।
भाव यथातथ्य सेवविती ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे जाणोनी अंतर ।
तैसाची प्रकार प्रेरिताती ॥४॥
