मी तो दीन नेणे रंक ।
597.
मी तो दीन नेणे रंक ।
परि तुम्ही चाळक ब्रम्हांडा ॥१॥
केले अपराध क्षमा करा ।
काय म्या दातारा विनवावे ॥२॥
येवढेंचि आहे माझे हाती ।
यावे काकुळती तुम्हासी ते ॥३॥
निळा म्हणे उचिता जागा ।
आपुल्या हो श्रीरंगा पंढरीच्या ॥४॥
597.
मी तो दीन नेणे रंक ।
परि तुम्ही चाळक ब्रम्हांडा ॥१॥
केले अपराध क्षमा करा ।
काय म्या दातारा विनवावे ॥२॥
येवढेंचि आहे माझे हाती ।
यावे काकुळती तुम्हासी ते ॥३॥
निळा म्हणे उचिता जागा ।
आपुल्या हो श्रीरंगा पंढरीच्या ॥४॥