वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

सुख या संतसमागमे । न

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072912 · अभंग क्र. ४०३४

4034.
सुख या संतसमागमे । नित्य दुनावे तुझिया नामे । दहन होती सकळ कर्मे । सर्वकाळ प्रेमे डुल्लतसो ॥१॥
म्हणोनि नाही काही चिंता । तूचि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिका गोता सर्वाठायी ॥२॥
ऐसा हा कळला निर्धार । मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनिया धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळी ॥३॥
दुःख ते कैसे नये स्वप्नासी । भुक्तीमुक्ती झाल्या कामारी दासी । त्यांचे वर्म तू आम्हापाशी । सुखे राहिलासी प्रेमाचिया ॥४॥
जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापे पळती दोष । काय ते उणे आम्हा आनंदास । सेवू ब्रम्हरस तुका म्हणे ॥५॥

अर्थ :
संतसंगतीत राहिल्यानंतर जे सुख प्राप्त होते तेच सुख तुझे नाम घेतल्याने दुप्पट वाढते. आणि त्यामुळे सर्व कर्मे जळून जातात व सर्व काळ आम्ही प्रेम आनंदात डुल्लत राहतो. देवा आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता नाही कारण तूच आमचा मातापिता, तूच आमची बहिण भाऊ आणि चुलता व इतर सर्व गोत्रज आणि सर्व ठिकाणी तूच आम्हाला आहेस. देवा आता मला पूर्णपणे निश्चय झाला आहे की, तुला माझा विसरच पडत नाही. देवा आता मला याही गोष्टीचा निर्धार झाला आहे की, तू मला धीर देतोस आणि माझ्या आतर बाह्यदेखील वास्तव्य करुन माझ्याजवळ नेहमी तू असतोस. दु:ख म्हणजे काय आहे ते माझ्या स्वप्नात देखील येत नाही ते कसे आहे मला माहितही नाही भोग आणि चारही मुक्ती माझ्या हाताखाली काम करणा-या दासीप्रमाणेच आहे. याचे मुख्य वर्म म्हणजे तू सर्वाचा मालक आहेस, धनी आहेस आणि तूच आमच्याजवळ प्रेमाने राहिला आहेस त्यामुळे त्यांनाही आमच्याजवळच राहावे लागते आहे हे निश्चिंत आहे. तुकाराम महाराज

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग