लावियेला दीप निरंजन
1088.
लावियेला दीप निरंजन ज्योति | प्रकाशल्या दीप्ती तन्मयाच्या ॥१॥
पूजूनि समाधि निघाले बाहेर | प्रेमे ज्ञानेश्वर डुल्लतसे ॥२॥
अनुमानिले स्थळ सभोंवती सारे | धन्य ज्ञानेश्वरे कृपा केली ॥३॥
देव आणि नामा रुक्माई राही | स्फुंदती ठायी ठायी संतजन ॥४॥
