सर्वकाळी एकात्मता ।
1419.
सर्वकाळी एकात्मता ।
जोडली त्या भाग्यवंता ॥१॥
ज्याचा गेला अहंकार ।
गळोनीया मद मत्सर ॥२॥
जे जे दृष्टीपुढे देखे ।
ते ते हरीरुपे वोळखे ॥३॥
निळा म्हणे नित्य केला ।
पूर्णबोधे उदो त्याला ॥४॥
1419.
सर्वकाळी एकात्मता ।
जोडली त्या भाग्यवंता ॥१॥
ज्याचा गेला अहंकार ।
गळोनीया मद मत्सर ॥२॥
जे जे दृष्टीपुढे देखे ।
ते ते हरीरुपे वोळखे ॥३॥
निळा म्हणे नित्य केला ।
पूर्णबोधे उदो त्याला ॥४॥