योगी शिणताती साधनकपा
293.
योगी शिणताती साधनकपाटीं । तया नोहे भेटी कांही केल्या ॥१॥
तो हरी गोकुळीं बाळवेषे खेळे । पुरती सकळ मनोरथ ॥२॥
गोपिका तयासी कडेवरी घेती । वालादुला म्हणती माझे माझे ॥३॥
एका जनार्दनी जया जैसा हेत । तैसा पुरवीत देवराव ॥४॥