मानसपूजा
9.
9. मानसपूजा
या पाठांचा अनुभव लवकर यावा यासाठी एक प्रभावी उपाय साधकांना सुचवावासा वाटतो. तो म्हणजे 'मानसपूजा'. मानसपूजेत त्या त्या दैवतांचा संबंधसाक्षात मनाशी जोडला जात असल्याने व मन हे शरीरापेक्षा सूक्ष्म असल्याने आपण त्या दैवताच्या निकट लवकर जातो.
या संदर्भात महर्षी रमण यांना भेटलेल्या एका वृद्ध स्त्रीची गोष्ट या ठिकाणी मुद्दाम सांगावीशी वाटते.
एकदा महर्षी रमण यांच्या दर्शनासाठी दोन वृद्ध स्त्रिया आल्या. नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्यातल्या एका वृद्ध स्त्रीने महर्षींना नम्र स्वरात म्हटले, 'महाराज, आज गेली.....
द्यावे अशी मी त्यांची कळवळून प्रार्थनाही करते. परंतु माझी इच्छा अद्याप पूर्ण होत नाही. '
त्यावर महर्षी क्षणभर विचारमग्न होऊन मग म्हणाले, 'तुम्ही उद्यापासून भगवंताची मानसपूजा सुरू करा आणि मला तीन महिन्यांनी पुन्हा भेटा. '
महर्षींचा निरोप घेऊन ती वृद्धा आनंदाने तेथून निघून गेली.
त्यानंतर तीन महिने उलटले आणि ती अतिशय तृप्त अंतःकरणाने पुन्हा महर्षींकडे आली आणि त्यांना वदन करीत म्हणाली, 'महाराज, माझे काम झाले! भगवंतांनी मला साक्षात दर्शन दिले!!'
मानसपूजेचा महिमा असा आहे!
मानसपूजा कशी करावी?
'श्री नवनाथ' पोथीचे आपले रोजचे पारायण पूर्ण झाल्यावर त्याच आसनावर डोळे बंद करून बसावे व डोळ्यापुढे कोणत्याही एका (आपल्या जास्त आवडणार्या) नाथांची मूर्ती आणावी. मात्र ही मूर्ती दगडी नसावी तर जिवंत स्वरूपातील असावी. त्यानंतर त्यांना नम्रभावाने मनानेच वंदन करून आपण एरवी करतो तशीच पूजा परंतु मनाने करण्यास सुरुवात करावी. पूजेचे सर्व उपचार मनानेच करावयाचे असल्याने पूजेसाठी सोन्या-चांदीची उपकरणे किंवा रत्नजडीत समयाही सहजपणे वापरता येतील! ही पूजा सुरू असताना 'ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः' किंवा 'ॐ चैतन्य जालंदरनाथाय नमः' इ. कोणताही मंत्र (आपल्या आवडीनुसार) सतत मनामध्ये सुरू असावा. त्यामुळे चित्त अन्यत्र जात नाही व एकाग्रता साधण्यास मदत होते.
या पूजेच्या वेळी नाथांना शुद्धोदकाने स्नान घालावे, भस्म आणि गंध लावावे. गळ्यात हात घालावा, मस्तकावर व पायांवर फुले वाहावीत. उदबत्ती लावावी, धूप दाखवावा आणि विनम्रभावाने वंदन करावे. नंतर नैवेद्य दाखवून त्यांची आरती करावी. त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांची कृपा होण्यासाठी प्रार्थना करावी. (इतरही काही मागणे असल्यास ते मागावे) हे सर्व झाल्यावर ती पूजा मनानेच विसर्जित करावी व डोळे उघडावेत.
मानसपूजा दैवताच्या जवळ लवकर नेते. त्यामुळे तिचे महत्त्व विशेष आहे. या मानसपूजेला वेळही कमी लागतो व ती कोणत्याही साधनांशिवाय व कुठेही करता येते.
शुद्ध आचरणाची गरज
तथापि, नाथांच्याकृपेसाठी व प्रसन्नतेसाठी केवळ ऐवढेच करून भागणार नाही. पारायणकर्त्याने आपले नेहमीचे दैनंदिन आचरणही शुद्ध व अत्यंत निर्मळ ठेवले पाहिजे. त्याचे आहारावर काटेकोर नियंत्रण असले पाहिजे. खर्या साधकाने शक्यतो बाहेरचे (परान्न) खाऊच नये हे उत्तम. कारण त्या अन्नावर कोणते संस्कार झालेले असतील हे सांगता येत नाही. परंतु आजकाल बाहेरचे आयतेच पदार्थ घरी आणून खाण्याची तरुण-तरुणींना एक चटकच लागली आहे. ज्यांना साधना करून काही प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्यांनी तरी काही नियम हे कटाक्षाने पाळायलाच हवेत. त्याशिवाय त्यांना साधनेतले दिव्य अनुभव प्राप्त होणे कदापिही शक्य नाही!
साधकाने दुसर्याला लुबाडणे, फसविणे, या गोष्टीही टाळायलाच हव्यात. 'आम्ही एवढी पारायणे केलीत परंतु आम्हाला दैवी दृष्टांत एकदाही झाला नाही' अशी वारंवार तक्रार करणार्या पाठकांनी थोडे अंतर्मुख होऊन आले काय चुकते आहे याचा शोध कठोरपणे घ्यायला हवा आणि मगच दृष्टान्त वगैरेची अपेक्षा करायला हवी!
