वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

काय वाणू आता पायाचा

🙏 4. संत नामदेव · ABH-083701 · अभंग क्र. ४९०

490.
काय वाणू आता पायाचा महिमा । जेथे झाली सीमा बोलायाची ॥१॥
विठोबाचे पाय आठविता मनी । गेले हरपोनी भवभय ॥२॥
पाय नारदाने ह्लदयी धरिता । ब्रम्हांडी मान्यता झाली त्याची ॥३॥
सनकादिकांलागी पाय वज्र कवच । ब्रह्मादि-देवांस पद जेणे ॥४॥
लागतांचि पाय शिळा दिव्य झाली । पाषाण तारिले उदकावरी ॥५॥
पाय ते रमेचे सौभाग्य साजिरे । योगि ऋषीश्वर थोर जेणे ॥६॥
नामा म्हणे मनी पाय सर्वकाळ । म्हणोनि सुकाळ आनंदाचा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग