जपजाप्य मंत्र नको यं
891.
जपजाप्य मंत्र नको यंत्र तंत्र । वर्णिजें जगत्र रामनाम ॥१॥
पाउला पाउली घडतसें यज्ञ । तेणे सर्व पुण्य हाती जोडे ॥२॥
संतांची संगतीं नामाचा निजध्यास तेणे । जोडे सौरस हाती मग ॥३॥
होई सावधान म्हणे जनार्दन । एकनाथ पूर्ण होईल धन्य ॥४॥
