संतदरुशनें लाभ होय ।
1508.
संतदरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव ॥१॥
पुराणीं महिमा सांगे व्यास । संतदया सर्वांस सारखी ॥२॥
यातिकुळ हो का भलतें । करिती सरते सर्वांसी ॥३॥
एका जनार्दनी शरण । संतमहिमान वेगळें ॥४॥
1508.
संतदरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव ॥१॥
पुराणीं महिमा सांगे व्यास । संतदया सर्वांस सारखी ॥२॥
यातिकुळ हो का भलतें । करिती सरते सर्वांसी ॥३॥
एका जनार्दनी शरण । संतमहिमान वेगळें ॥४॥