वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ५, संत तुकाराम गौळणी

आजि का वो तू दिससी द

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073207 · अभंग क्र. १७३

173.
आजि का वो तू दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्ती ।
दिले ठेवू ते विसरसी हाती । नेणो काय बैसला हरि चित्ती वो ॥१॥
सर सर परती जालीस आता भांड । कैसे दाखविसी जगासी या तोंड ।
व्याली माय ते लाजविली रांड । नाही थार दो ठायी जाला खंड वो ॥धृ॥
होते तैसे ते उमटले वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी ।
नाही मर्यादा निःसंग बावरी । मन हे गोविंदी देह काम करी वो ॥२॥
नाही करीत उत्तर कोणासवे । पराधीन भोजन दिले खावे ।
नाही अचळ सावरावा ठावे । देखो उदासीन तुझे देहभाव वो ॥३॥
कोठे नेणो हा फावला एकांत । सदा किलकिल भोवती बहुत ।
दोघे एकवाटा बोलावया मात । नाही लाज धरिली दिला हात वो ॥४॥
करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासासुना ।
परा भक्ति हे शुद्ध तुम्ही जाणा । तुका म्हणे ऐसे कळो यावे जना वो ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग