वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ५, संत तुकाराम गौळणी

होते बहुत हे दिवस मा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073206 · अभंग क्र. १७२

172.
होते बहुत हे दिवस मानसी । आजि नवस हे फळले नवसी ।
व्हावी भेटी ते झाली गोविंदासी । आता सेवा करीन निश्चयेसी वो ॥१॥
स्थिर स्थिर मजचि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।
येथे आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आले ते दुसरे वारा वो ॥धृ॥
मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळे होऊ एकी घडी ।
नाही लौकिक स्मरला आवडी । आता येणे काळे या लोभे वेडी वो ॥२॥
उदयी उदय साधिला अवकाश । निश्चिंतीने निश्चिंती सावकाश ।
धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग