तुमचे कृपेंचे पोसणे
1740.
तुमचे कृपेंचे पोसणे । त्याचे धांवणे करा तुम्ही ॥१॥
गुंतलोंसे मायाजळीं । बुडतों जळीं भवाच्या ॥२॥
कामक्रोध हे मगर । वे ढिताती निरंतर ॥३॥
आशा तृष्णा या सुसरी । वेढिताती या संसारी ॥४॥
म्हणोनि येतो काकुळती । एका जनार्दनी विनंती ॥५॥
