काय उणे आम्हा विठोबा
216.
काय उणे आम्हा विठोबाचे पायी । नाही ऐसे कांई येथे एक ॥१॥
ते हे भोवताले ठायी वाटू मन । बराडी करून दारौदारी ॥२॥
कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणिक आगळा दुजा सांगा ॥३॥
तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गांवी । फुकाची लुटावी भांडारे तिया ॥४॥
