जेथे न रिघे ठाव लक्ष
161.
जेथे न रिघे ठाव लक्षिता लक्षणे । सूर्य तारांगण हरपती ॥१॥
ते रूप रूपस कृष्णब्रह्मनाम । गौळिया सप्रेम वोळलेंसे ॥२॥
जेथे लय लक्ष हरपोन सोये । द्वैत ते न साहे सोहंबुद्धि ॥३॥
निवृत्ति मान्यता सेवितु साकार । आपण आपार गोपवेषे ॥४॥
अर्थ:
त्या परब्रह्माचे लक्षित लक्षण पाहिले तर त्याचा ठाव घेता येत नाही. त्याच्या स्वरुपात अनेक सुर्य तारांगणे हरपतात. ते मोठ्या प्रेमाने गौळियांना भेटणारे ते सुंदर रुप म्हणजे कृष्णरुप आहे. त्याच्या रुपात लक्षचा लय होऊन हरपुन जाते व सोहं ब्रह्म ही उपाधी ही द्वैत वाटायला लागते व जीव शिवाचे ऐक्य होते. निवृतिनाथ म्हणतात, ज्या गोपाळ वेशाचा आधार घेऊन ते परब्रह्म आले आहे. त्यांची मी अपार सेवा करतो.
