वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

शिवभवानी उपदेशी प्रा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075034 · अभंग क्र. १५२

152.
शिवभवानी उपदेशी प्राणप्रिये ।
निजमानसी ध्याये परमानंदु पाहे ॥
रामु सखा हरि रामु सखा ।
रामु सखा हरि रामु सखा ॥
सहस्त्र नामावरी कळसु साजे ।
तोचि तो अंतरी बाहिजु भीतरी ॥
हाचि निजधर्म हेचि निजकर्म ।
हेचि परब्रह्म वर्म हेचि एकु ॥
जिवाचे जीवन मनाचे मोहन ।
सुखाचे साधन भक्तिज्ञानाचे अंजन ॥
बापरखुमादेविवरु सुलभु साकारु ।
अर्धमातृका अक्षरु चिदानंदु सुख थोरु ॥

अर्थ :
महादेव प्राणप्रिय भवानीला उपदेश करतात की त्याचे निजमानसात ध्यान कर त्यात परमानंद आहे. तोच राम व हरि हे सखा आहे हे द्विरुक्तिने सांगतात. हेच रामनाम अनेक सहस्त्र नामांचे हे कळस आहे. तोच राम अंतर बाह्य आहे त्याचे सतत स्मरण कर. हेच तुझे निजकर्म व निजधर्म आहेत. तेच त्या परब्रह्माचे वर्म आहे. तेच नाम जीवाचे साधन मनाचे मोहन असुन हेच सुखाचे साधन व भक्तीज्ञानाचे अंजन आहे. ॐ ह्या अक्षराची अर्धमात्रा अर्थात परमेश्वर आहे म्हणुन ते अक्षर चिंदानंद स्वरुप आहे असे तसैच माझे पिता व रखुमाईचे पती सुलभ आहेत असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग