तुम्हा आम्हा चौघे सा
497.
तुम्हा आम्हा चौघे सांगतील आता ।
चला पंढरीनाथा उठा वेगी ॥१॥
बहु भीड केली आमुचे उचित ।
भलेपण येण कोण पुसे ॥२॥
सा चौघे अठरा सांगू दोघेजण ।
घातलीसे आण उठा वेगी ॥३॥
बहेणि म्हणे जाणे बाहेर लागले ।
घरात बुडविले कोण सोसी ॥४॥
