वरीवरी बोला रस । कथी
388.
वरीवरी बोला रस । कथी ज्ञाना माजी फोस ॥१॥
ऐसे लटिके जे ठक । तया इह ना पर लोक ॥धृपद॥
परिस एक सांगे । अंगा धुळीही न लगे ॥२॥
तुका म्हणे हाडे । कुतर्या लाविले झगडे ॥३॥
अर्थ :
वरवर ब्रम्हज्ञानाचा किंवा ज्ञानाच्या कितीही रसभरीत बोल बोलले तरी अनुभवाचुन ते बोल टरफला सारखे आहेत. अशा ठक लोकांना इह लोकात सुख मिळत नाही व परलोकातही चांगली गती मिळत नाही. दुसऱ्याने सांगितलेल ऐकून जो तेच बडबडतो त्याला परमार्थाचा अंशही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे नुसतेच शब्द वाचाळपाणाने बोलने, म्हणजे हाडासाठी कुत्री भांडतात तशी भांडणे अशी अवस्था विद्वानांची होत असतात.
