माझ्या तो मने केलासे
206.
माझ्या तो मने केलासे विचार । आणिक प्रकार नेणे कांही ॥१॥
नाम वेळोवेळा आठवावे वाचे । दुजे आणिकांचे भय नाही ॥२॥
आवडी बैसली विठूचे चरणी । आता दुजेपणी नाही गोष्टी ॥३॥
चोखा म्हणे दृढ केलोसे संती । म्हणोनी विश्रांती जीवा झाली ॥४॥
