नाही तुम्हापाशी कवणे
581.
नाही तुम्हापाशी कवणेविशी उणे ।
नांदतसा गुणे संपत्तीच्या ॥१॥
न करावा अव्हेर तुम्ही अनाथाचा ।
बडिवार तुमचा हाचि असे ॥२॥
देऊ म्हणाल तरी ब्रम्हांड तुमचे ।
अंगी ऐश्वर्याचे सामर्थ्यही ॥३॥
निळा म्हणे भेटी न लावाल उशीर ।
क्षणेंची अवतार धरोनी ठाका ॥४॥
