नामयाची कांता धुणें
3618.
नामयाची कांता धुणें धुया गेली । परिसा भागवताची आली कन्या तेथे ॥१॥
उभयतां बैसोनि केलासे एकान्त । आपदा आमुची होत संसारात ॥२॥
तुम्हांसी तो देवे द्रव्य दिले फ़ार । वस्त्र अलंकार शोभताती ॥३॥
एका जनार्दनी बोलोनिया गोठी । होत असे कष्टी राजाई ते ॥४॥
