पोटासाठी जरी करी हरि
1855.
पोटासाठी जरी करी हरिकथा | जन रंजविता फिरतसे ॥१॥
तेणे घात केला एकोत्तरशतकुळांचा | पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर ॥२॥
द्रव्याचिये आशे हरिकथा करी | तया यमपुरी नित्य वास ॥३॥
नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी | ते नर नयनी पाहू नये ॥४॥
