सर्व सुखाचिया आशा जन
4019.
सर्व सुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाही केला । हिंडता दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥१॥
माझे स्वहित नेणती कोणी । काहीच न करिता मजवांचुनी । सज्जन तव सुखाची मांडणी । नेणती कोणी आदिअंत ॥धृपद॥
काय सांगो गर्भीची यातना । मज भोगिता नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणाक्षणा ध्यात असे ॥२॥
मज चालता प्रयाणकाळी । असता न दिसती जवळी । मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळी संचिताचे ॥३॥
आता मज ऐसे करी गा देवा । काही घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवी दावा संसारे ॥४॥
अर्थ :
माझा सर्व जन्म सुखाची अपेक्षा करण्यातच गेला परंतु एक क्षण देखील मुक्तीसाठी प्रयत्न केला नाही. अनेक जन्ममरणरुप योनीच्या दिशा हिंडून हिंडून माझा जीव शीण पावला आहे म्हणजे त्रासला आहे कारण माझ्या जीवाला मायेने वेढले आहे. माझे स्वहित कोणी जाणतही नाही आणि माझ्या स्वहिताविषयी माझ्यावाचून कोणी काहीच करणार नाही. माझे आप्त, इष्ट, नातेवाईक, सज्जन सोयरे हे तर केवळ माझ्या सुखाचे सोबती ते केवळ सुखाचे मान्य आहे परंतु माझा आदी व अंत कसा आहे हे कोणीही जाणत नाहीत. हे नारायणा मी गर्भामध्ये असताना काय यातना भोगल्या आहेत ते तुम्हाला काय सांगू ? गर्भामध्ये असताना मी मांस मलमूत्र यामध्ये वेढलो गेलो होतो त्यावेळी मी तुला क्षणाक्षणाला आठवित होतो. माझ्या प्रयाणकाळी म्हणजे प्राणांतकाळी माझ्याजवळ असलेले इष्ट नातेवाईक आप्तेष्ट, सगेसोयरे हे कोणीही मला दिसत नाहीत. देह ही मातीच आहे शेवटी ती मातीच्याच मध्ये एकरुप होते मातीलाच मिठी मारते आणि शेवटी केवळ एका संचिताशीस सं
