आता घेई माझे । भार स
2100.
आता घेई माझे । भार सकळ ही ओझे ॥१॥
काय करिसी होई वाड । आलो पोटासी दगड ॥धृपद॥
तू चि डोळे वाती । होई दीपक सांगाती ॥२॥
तुका म्हणे काही । विचाराया चाड नाही ॥३॥
अर्थ :
हे आई पांडुरंगे आता माझ्या योगक्षेमांचा सर्व भार घे. मी जरी तुझ्या पोटाला दगडासारखा जड मूढ जन्माला आलो असलो तरी आता काय करतेस ? तूच आपले मन मोठे कर ;आणि माझा अंगीकार कर म्हणजे झाले. तूच माझे डोळे आहेस. तूच या अज्ञानांधकारात प्रकाश देणारा दिवा होऊन परमार्थ मार्गातील सोबतीण हो. तुकाराम महाराज म्हणतात आई एवढे माझे मनोरथ पूर्ण करण्याविषयी तुला विचार करण्याची गरजच काय ? कारण तू सर्वज्ञ सर्वशक्तीमान आहेस. ’’
