जप तप अनुष्ठान । नित
156.
जप तप अनुष्ठान । नित्य आमुचे रामघन ।
रामकृष्ण नारायण । हाचि जिहार सर्वदा ॥
जयाशी अमृत घट । रामकृष्ण घडघडाट ।
हेखि पूर्वजाची वाट । सर्व जीवाशी तारक ॥
गोविंद गोविंद राम । सर्व साधिले सुगम ।
नलगे उत्तम । रामकृष्ण पुरे आम्हा ॥
ज्ञानदेव आन ध्यान । राम राम नारायण ।
इतुकेंचि पुरे अनुष्ठान' ॥ हेचि जीवन शिवाचे ॥
अर्थ :
रामकृष्ण नारायण हेच आमचे जप तप अनुष्ठान व हेच आमचे जिव्हार व धनही आहे. ज्याच्या जवळ रामकृष्णनामाचा घडघडाट करणारा घट आहे ते सहज अमर होतात ह्याच मार्गे आमचे पुर्वज गेले. गोविंद नामाचा तप हाच सोपा जप असुन रामकृष्णनाम हेच पुरेसे आहे. बाकी तपांची गरज नाही. राम नारायण ह्याचाच जप स्वतः महादेवांनी केला त्यामुळे त्याचेच अनुष्ठान आम्हास पुरे आहे असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
कुठला प्रकरण पाठवा
157
समाधि धन्य रामनामे । आम्हा सर्व कर्मे समे ।
कृष्ण वाचे नित्य नेमे । जिव्हे पाठ हरिगोविंद ॥
हेची तारक पाठांतर । नित्य समाधीचे घर ।
शिव शंभुसी निरंतर । जपमाळ सर्वथा ॥
जीवाचे जीवन श्रीहरि । चिंता प्राणीयाची हरी ।
अंती चतुर्भुज करी । सर्व श्रीहरि माझा तो ॥
ज्ञानदेव सर्वोपरी । यंत्र साधिले श्रीहरि ।
वैकुंठीचा विहारी । हृदयातरी घातला ॥
अर्थ :
जिभेने हरिगोविंद नामाचा पाठ केल्याने त्याचा नित्यनेम लाभला व त्या रामनामाने समाधी ही लाभली. तेच पाठांतर, तेच समाधीचे घर असुन ती जपमाळ सतत शिवजी जपत होते. तो माझा हरि जीवाचे जीवन आहे तो प्राण्यांच्या चिंतेच हरण करतो व शेवटी त्याच्या सारखे चतुर्भुज करतो. त्याच हरिनामाचे यंत्र करुन ते हृदयात जपले त्यामुळे वैकुंठात विहार केला असे माऊली सांगतात.
