वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ५, नामग्रहण १५६ ते १६०

सकळ संप्रदाय श्रीहरि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075176 · अभंग क्र. १५८

158.
सकळ संप्रदाय श्रीहरि । जो बैसोनि जप करी ।
जिव्हे महादेवाचे अंतरी । सर्वकाळ वसतसे ॥
रामनामे जप करी । तोचि तरे भवसागरी ।
पितरांसहित निर्धारी । वैकुंठपुरी पावले ॥
नित्य सत्य समाधान । निर्मळ करावे मन ।
नित्य तयासी नारायण । वैकुंठवास करील ॥
बापरखुमादेविवर सिद्धि । तरुणोपाय हेचि बुद्धि ।
कृपा करील कृपानिधी । ऐसिया भक्तांशी जाणावे ॥

अर्थ :
महादेवाच्या जिव्हेवर बसलेल्या रामनामाच्या जपा मुळे तेच नाम जपणाऱ्या सांप्रदायिकाला सतत वैकुंठवास मिळतो. जो सतत रामनाम जपतो तो भवसागर तरुन पितरांसह वैकुठाला जातो. जसे करणाऱ्याला नित्य सत्य, समाधान, निर्मळ मन व प्रत्यक्ष तो नारायण लाभतो व तो ही वैकुंठाला वास करतो. ते माझे पिता व रखुमाईचे पती यांचे नाम घेतल्याने सर्व सिध्दी प्राप्त होतात ती बुध्दीच त्याचा तरणोपाय बनते. तो कृपानिधी त्याच्या वर कृपा करतो असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग