अवगुण ज्याचे तया न द
209.
अवगुण ज्याचे तया न दिसती ।
म्हणोनी नच होती क्लेश तया ॥१॥
काय करू यासी न चले उपाय ।
इंद्रावण नोहे गोड कदा ॥२॥
अग्नीचा हा ताप जाळी भलतेया ।
त्याचा गुण तया बरा वाटे ॥३॥
बचनाग मारक करी प्राणहानि ।
त्याचे त्यालागोनी न कळे काही ॥४॥
बहेणि म्हणे जाण कोळसा हा शुभ्र ।
होईल ते अभ्र नभी खरे ॥५॥
