नाही म्हणता अवघे तेच
1505.
नाही म्हणता अवघे तेचि ।
आहे म्हणताचि दाविता नये ॥१॥
म्हणोनिया न चले शब्द ।
राहे विवाद ऐलाडी तो ॥२॥
डोळा देखणा देखे सर्व ।
न देखे बरव आपुली तो ॥३॥
निळा म्हणे तेवी जाणो जाता ।
जाणणेचि तत्त्वता वस्तु होये ॥४॥
1505.
नाही म्हणता अवघे तेचि ।
आहे म्हणताचि दाविता नये ॥१॥
म्हणोनिया न चले शब्द ।
राहे विवाद ऐलाडी तो ॥२॥
डोळा देखणा देखे सर्व ।
न देखे बरव आपुली तो ॥३॥
निळा म्हणे तेवी जाणो जाता ।
जाणणेचि तत्त्वता वस्तु होये ॥४॥