आश्वासिलें भक्ता दिल
3382.
आश्वासिलें भक्ता दिले सर्व सुख । बैसविले लोक विमानांत ॥१॥
नारी नर पशू जीवजंतु भुते । विमानी समस्ते बैसविलीं ॥२॥
पातली मोहनी म्हणे देवराया । सांडिसी का वाया मजलागी ॥३॥
कोण अपराध घडलासे मज । दीनानाथ साजे नाम तुम्हा ॥४॥
इंद्र आज्ञेमुळे छळियेले राया । एका जनार्दनी पाया लागतसे ॥५॥
