ऐसी कोण आहे उदार जीव
419.
ऐसी कोण आहे उदार जीवावी ।
गोडी घे तयाची मनोभावे ॥१॥
आपुलेनि हाते धरा लावी आगी ।
मग त्याच्या संगी सुख भोगी ॥२॥
जनवाद लोक बोलती अपार ।
न संडी निर्धार संग त्याचा ॥३॥
बहेणि म्हणे कायावाचामनप्राण ।
परपुरूषालागोन रातलीसे ॥४॥
