भक्ति करुनिया कोण वा
656.
भक्ति करुनिया कोण वाया गेला | सांगा हो विठ्ठला निवडुनि ॥१॥
द्वापाराचे अंती नामची सुकृत | अद्यापि निश्चित चालतसे ॥२॥
नाम ऐकता तरती निर्धारी | व्याख्यान श्रीधरी टीकाकार ॥३॥
नामा म्हणे राम व्यापी त्रिभुवन | नाम ते निधान कलियुगी ॥४॥
