वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

जय विश्वव्यापका विश्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086616 · अभंग क्र. २१२२

2122.
जय विश्वव्यापका विश्वमुर्ति वंदन । वर्णिता थकले सहा अठराजण ।
मुनिजन धुंडती साधिती साधन । नव्हे दरुशन तयांसी ॥१॥
तो तू लाघवा सुत्रधारी । करिसी गोकुळामाजी चोरी ।
धरिता न सांपडसी निर्धारी । आगमनिगमां सरी न पवेची ॥२॥
न कळे न कळे कवणा महिमान । शेषादिक श्रमले जाहले आसन्न ।
शरण एका जनार्दन । काया वाचा मन दृढेंसी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग