वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ९, अंबुला अभंग ९१५ ते ९३२

विचारिता देही अविचार

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074590 · अभंग क्र. ९१५

915.
विचारिता देही अविचार अंबुला ।
न साहे वो साहिला काय करू ॥१॥
सखी सांगे गोष्टी चाल कृष्णभेटी ।
आम्ही तुम्ही शेवटी वैकुंठी नांदो ॥२॥
येरी सांगे भावो जावे वो प्रवृत्ती ।
तव वरी गती येता नये ॥३॥
ज्ञानदेवो प्रवृत्ति निघालिया तत्परा ।
हरि आला सत्वरा तया भेटी ॥४॥

अर्थ :
वास्तविक विचार करु गेले तर या देहांत अविचारच शिरजोर झाला आहे. मला तो सहन होत नाही. पण काय करु तेही समजत नाही. तिला तिची मैत्रिण सांगत आहे की आपण दोघी त्या श्रीकृष्णाच्या भेटीला जाऊ. त्याची भेट झाली म्हणजे आपण दोघी आनंदात वैकुंठी नांदू. ती उत्तर सांगते तू त्या श्रीकृष्णाकडे शुद्ध भावाने जा. अनधिकारामुळे मला श्रीकृष्णाच्या भेटीस येवत नाही. त्या श्रीकृष्णाकडे माझी प्रवृत्ति झाल्याबरोबर तो श्रीहरि तात्काळ माझ्या हृदयांत आला. व मी तत्परच होऊन गेलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग