आतीचे आर्त होते माझय
855.
आतीचे आर्त होते माझया मनी ।
बहुत दिवस नयनी प्रकाशले ते ॥१॥
भरोनिया कोदंली चौदाहि भुवने ।
सुतेज केली गगने याचेनि तेजे ॥२॥
आवडीचे निज प्रकाशले गुज ।
आता नाचेन भोज येणे छंदे ॥३॥
निळा म्हणे दिशा व्यापूनिया मही ।
प्रकाश माझया देही संचरला तो ॥४॥
