वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

काय आम्ही केले ऐसे ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080459 · अभंग क्र. ३२२५

3225.
काय आम्ही केले ऐसे । नुद्धरीजेसे सांगावे ॥१॥
हरण कोल्हे वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥धृपद॥
गजा नाड्या सरोवरी । नाही हरी विचारिले ॥२॥
तुका म्हणे गणिका नष्ट । माझे कष्ट त्याहूनि ॥३॥

अर्थ :
देवा तुम्ही आमचा उध्दार करीत नाही मग आम्ही काय करावे ते आम्हाला सांगावे. देवा अहो तुम्ही हरीण कोल्हे यांना देखील वैकुंठात नेले सांगा त्यांचा असा अधिकार तरी काय होता ? अहो हरी ज्यावेळी गजेंद्र पशू सरोवरामध्ये अडकला होता नक्राने त्याचा पाय धरला त्यावेळी त्याने एकच हाक मारली त्यावेळी तुम्ही त्याच्या मदतीला लगेच धावून आलात मग त्याचा मागचा पुढचा दोष पाप याचा काहीच विचार तुम्ही केला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अहो गणिका वेश्या होती ती तर पापी होती तिने केवळ अंत:काळी पोपटाला उद्देशून राघोबा राघोबा असे तुझे नाम उच्चारले तरी तू तिचा उध्दार केलास मग तिच्यापेक्षा माझ्या भक्तीचे कष्ट तर जास्तच आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग