कथाश्रवणे उपजे विरक्
1080.
कथाश्रवणे उपजे विरक्ति ।
कथाश्रवणे वाढे शांति ।
कथाश्रवणे परमानंद प्रप्ति ।
कथा श्रवणे ॥१॥
पापी उध्दरती ।
कथा श्रवणे उपाधी तुटे ।
कथाश्रवणे भवाब्धि आटे ।
कथाश्रवणे सच्चिदानंद भेटे ।
समुळ तुटे मायाजाळ ॥२॥
कथाश्रवणे स्वरुप स्थिति ।
कथाश्रवणे विषय समाप्ती ॥३॥
कथाश्रवणे मीपण नुरे ।
कथाश्रवणे अभिमान विरे ।
कथाश्रवणे कल्पनाहि चुरे ।
ब्रम्ह साक्षात्कारे भेटिसी ये ॥४॥
निळा म्हणे प्रथम पायरी ।
हरिकथा श्रवण मनन वरी ।
निजघ्यासे आत्मया हरी ।
भेटीजे निर्धारी साक्षात्कारे ॥५॥
