प्रपंच घडामोडी न सरे
35.
प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी ।
वासनेची बेडी पडली पाया ॥१॥
सोडवण करा आलेनि संसारा ।
शरण जा उदारा देवराया ॥२॥
प्रबळ मोहपाश विषयासी गोंवी ।
अखंड भोगवी क्लेश नाना ॥३॥
सांवता म्हणे तुम्ही विचारावे मनी ।
सोईरा निर्वाणीं हरि एक ॥४॥
