हरिहरांचे चिंतनीं ।
1000.
हरिहरांचे चिंतनीं । अखंड वदे ज्याची वाणी ॥१॥ नर नोहे नारायण । सदा वाचे हरिहर जाण ॥२॥ पळती यमदुतांचे थाट । पडती दुर जाऊनी कपाट ॥३॥ विनोदें हरिहर म्हणता । मोक्षप्राप्ती तया तत्त्वता ॥४॥ एका जनार्दनी हरिहर । भवसिंधु उतरी पार ॥५॥
